GST चा गोंधळ, 165 रुपयांमुळे रेस्टॉरंटला बसला 10 हजारांचा दणका!


पवईतील एका हॉटेल व्यावसायिकाला बिलामध्ये जीएसटी लावल्यानंतर त्यात अतिरिक्त सेवाशुल्क आकारणे महागात पडलं आहे. ग्राहकाच्या बिलावर आधी सेवा शुल्क आकारले आणि त्यानंतर जीएसटी लावला. याविरोधात ग्राहकाने ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. यावर अतिरिक्त मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून दंड ठोठावला गेला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, घाटकोपर इथं राहणाऱ्या मनिषा बानावलीकर या दोन वर्षापूर्वी पवईतील मिनी पंजाब लेकसाइड रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या कुटुंबासोबत जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा जेवणाचे एकूण बिल 2 हजार 142 रुपये झाले होते. त्यांच्या जेवणाचे मूळ बिल 1 हजार 650 रुपये इतके होते. त्यावर रेस्टॉरंटने 165 रुपये इतके सेवाशुल्क आकारले. त्यानंतर एकूण रकमेवर पुन्हा जीएसटी लावला. याचे एकूण बिल मनिषा यांना 2 हजार 142 रुपये देण्यात आलं. तेव्हा मनिषा यांनी जीएसटी लावल्यानंतर स्वतंत्र सेवाशुल्क आकारण्याची काय गरज? असा प्रश्न विचारला. त्यानंतरही 2 हजार 142 रुपये हॉटेलने घेतले.
रेस्टॉरंटने आकारलेल्या अशा बिलानंतर मनिषा यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्यांनी तक्रार दाखल करताना रेस्टॉरंटचे बिल जोडले होते. तक्रारीनंतर ग्राहक मंचाने रेस्टॉरंटला नोटिस पाठवली आणि त्यावर उत्तर मागवले. ग्राहकाच्या तक्रारीनुसार जीएसटी आकारल्यानंतर पुन्हा त्यावर सेवाशुल्क घेणं योग्य नाही असं ग्राहक न्यायालयाने म्हटलं. त्यानंतर रेस्टॉरंटला दंड करण्यात आला.

No comments

Powered by Blogger.