अजित पवारांनी शिवथाळी नाकारली

अजित पवारांनी शिवथाळी नाकारली
शिवभोजन थाळी उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतील उपाहारगृहात पार पडला. पण, यावेळी अजित पवार यांनी शिवथाळी नाकारली. पण, असं करण्यामागचं योग्य कारणही त्यांनी दिलं.
उद्घाटनानंतर दादा थाळीची टेस्ट करा असा, आग्रह काही पत्रकारांनी केला. त्यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत शिवभोजन थाळी नाकारली. ते म्हणाले की, ‘मी जेवलो तर तुम्ही लगेच ब्रेकिंग चालवाल. अजित पवार यांनी गरिबाच्या थाळीवर ताव मारला.’ अजित पवारांच्या या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार पुढे म्हणाले की, पण इतक्या लवकर मी जेवत नाही, आरे मी दीक्षित डायटवर आहे.
यावेळी अजित अजित पवार म्हणाले की, निवडणुकीपूर्वी शिवभोजन थाळी देणार, त्या घोषणेप्रमाणे आम्ही गोरगरिबांसाठी थाळी देत आहोत. या थाळीचा गरीब होतकरू यांनी लाभ घ्यावा, ज्यांची ऐपत आहे. त्यांनी लाभ घेऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. तसेच यामध्ये काही त्रुटी असल्यास त्याचा देखील विचार करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.