मनसेचं महाअधिवेशन जवळ आलं असताना पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मनसे सोडून गेलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर जुने शिलेदार पुन्हा मनसेत सामील होणार का, याची चर्चा सुरू झाली. अशातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसैनिकांना अप्रत्यक्षपणे साद घातली आहे.
लाचारीचा तिटकारा असणाऱ्यांनी राज ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारावे अशा आशयाचे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. 'ज्यांना लाचारीचा तिटकारा आहे आणि महाराष्ट्र धर्माचा अभिमान आहे त्यांनी राज साहेबांचे नेतृत्व स्वीकारायला हवे. मराठा तितुका मेळवावा...महाराष्ट्र धर्म वाढवावा,' असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना खेचण्यासाठी मनसे प्रयत्न करत आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, मनसेच्या महाअधिवेशनाला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. मुंबई 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी मनसेचा हा महामेळावा होत आहे. या महावेळाव्यात राज ठाकरे हे पक्षाची नवी दिशा ठरवणार आणि सांगणार आहेत.
Post a Comment