एकूण ९ लाख पीएफ खाती ब्लॉक

ज्यांचं पीएफ खातेधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund Organisation- EPFO) जवळपास नऊ लाख कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ब्लॉक केली आहेत. केद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनेचा गैरवापर करणाऱ्या सुमारे ८० हजार कंपन्यांची यादी सरकारने केली आहे. या कंपन्यांनी फॉर्मल सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राच्या प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत बेकायदेशीर पद्धतीने तब्बल 300 कोटी रुपयांचा फायदा उचलला आहे. प्रधानमंत्री रोजगार योजनेचा अवैध लाभ जवळपास नऊ लाख जण घेत आहेत. पीएफ आणि प्रधानमंत्री रोजगार योजनेचा एकत्र लाभ घेणाऱ्या नऊ लाख कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ब्लॉक केली आहे.
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या नऊ लाख लाभार्थांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. हे नऊ लाख जण या योजनेचा यापुढं लाभ घेऊ शकणार नाहीत. ही योजना लागू होण्याआधी ९ लाख जण फॉर्मल सेक्टरचा भाग होते, म्हणजेच ते आधीपासूनच पीएफचा लाभ घेत होते. बिझनेस स्टँडर्ड वृत्तानुसार, दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या नऊ लाख कर्मचाऱ्यांवर भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ खाती ब्लॉक करत कारवाई केली आहे. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांकडून २२२ कोटी रूपयांची वसूलीही करण्यात आली आहे.

  1. वेबसाईटवर तुमचा पीएफ खात्यातील बॅलन्स चेक तपासण्यासाठी ईपीएफच्या https://epfindia.gov.in/site_en/index.php या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 
  2.  त्यासाठी तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर अॅक्टिवेट केलेला असण्याची गरज आहे. हा क्रमांक ईपीएफओ देतं व एम्प्लॉयर तो अॅक्टिवेट करतो. नोकरी बदलली तरी हा युएएन क्रमांक बदलत नाही, तो कायम राहतो.
  3. तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाइलच्या माध्यमातून तुम्ही या पोर्टलवर पासवर्ड सेट करू शकता आणि नंतर तिथं दिलेल्या सूचनांनुसार पासबुकच्या माध्यमांमधून पीएफ बॅलन्स चेक करू शकता.
  4. ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर ‘Our Services’ टॅबवर क्लीक करा. त्यानंतर For Employees या पर्यायावर क्लीक करा.
  5. ‘Services या पर्यायावर क्लीक करून ‘Member passbook’ हा पर्याय निवडावा
  6. युएएननंबर आणि पासवर्डने लॉगइन करा.
  •  ईपीएफओचं अॅप प्ले स्टोअरमध्ये असून ते डाऊनलोड करून मेंबर लॉगइनच्या ऑप्शनमधून बॅलन्स चेक करायची सोय आहे. इथंही नोंदणी असलेल्या मोबाइलच्या माध्यमातून जोडणी केली जाते.
  • केवायसी डिटेल्स पूर्ण झाले असतील तरच एसएमएसच्या माध्यमातून बॅलन्स जाणून घेता येतो. EPFOHO UAN ENG असा मेसेज टाइप करायचा ENG च्या जागी MAR टाइप केलं तर मराठीत माहिती मिळेल. आपला UAN त्यात टाकून हा मेसेज 7738-299-899
  • नोंदणीकृत मोबाइलवरून 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यावर एसएमएस येतो आणि पीफच्या डिटेल्स तुम्हाला कळवल्या जातात.


No comments

Powered by Blogger.