दिल्ली निवडणुकीत यंदा कोण बाजी मारणार?
![]() |
दिल्ली निवडणुकीत यंदा कोण बाजी मारणार? |
दिल्ली विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून आज काही पक्षांनी
उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. दिल्ली निवडणुकीत यंदा कोण बाजी
मारणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दिल्लीचे
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपमधून सुनील यादव निवडणूक
लढविणार असल्याची चर्चा आहे. सुनील यादव हे पेशाने वकील असून त्यांनी
दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. काल
सोमवारी रात्री यादवांच्या नावाची घोषणा झाली. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर
ते युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होते, त्यानंतर त्यांनी प्रदेश अध्यक्षपदही
भूषविले होते. भाजपमधील तरुण नेतृत्व दिल्ली विधानसभा निवडणुकीत उतरवून
केजरीवाल यांना आव्हान देण्यात येणार आहे.
Post a Comment