तुमच्या घरातला AC चालणार 24 डिग्रीवर :नवा नियम


उकाड्य़ापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कुलरसोडून एसी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. नवीन एसी खरेदी केल्यानंतर तुम्हाला सर्वात कमी तापमान 24 डिग्री सेल्सियस मिळणार आहे. हे ACमध्ये डिफॉल्ट तापमान म्हणून सेट करण्यात येणार आहे. याआधी 16 किंवा 17 डिग्रीपर्यंत ACचं तापमान कमी ठेवता येत होतं. याबाबत बीईई संस्थेनं सरकारसोबत चर्चा करून काही नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे तुम्ही नवीन एसी घेत असाल तर त्याचे नियमही समजून घेणं आवश्यक आहे.
सरकारने बदलेल्या नियमानुसार सर्व कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या एसीमध्ये डिफॉल्ट तापमान 24 अंश फिक्स केलं जाणार आहे. ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीने (बीईई) सरकारसोबत मिळून एनर्जी परफॉर्मंस स्टँडर्ड निश्चित केले आहेत. त्यासंबंधीची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. हा नियम 1 जानेवारी 2020 पासून लागू झाल्यानं नवीन एसी तयार करणाऱ्या सर्व कंपन्यांना हा नियम लागू होणार आहे. व्या नियमांनुसार, एसी सुरू केल्यानंतर डिफॉल्ट सेटिंग 24 अंश असेल, पण नंतर तुमच्या सोयीप्रमाणे तापमान तुम्ही एसीच्या तापमानात बदल करु शकतात.
बीईईने फिक्स्ड-स्पीड रूम एअर कंडिशनर्ससाठी स्टार लेबलिंग प्रोग्राम सुरू केला होता. जो 12 जानेवारी, 2009 साली अनिवार्य करण्यात आला. त्यानंतर 2015 मध्ये इनव्हर्टर रूम एअर कंडिशनर्ससाठी स्वैच्छिक स्टार लेबलिंग प्रोग्राम लाँच केल्यानंतर 1 जानेवारी 2018 रोजी लागू करण्यात आला. रूम एअर कंडिशनरच्या स्टार लेबलिंग प्रोग्रामने केवळ 2017-18 या आर्थिक वर्षात 4.6 अब्ज युनिट उर्जेची बचत केली आहे. ऊर्जेची बचत करण्यासाठी हा नवा नियम आणल्याचं सांगितलं जात आहे.
तापमानातील बदल आणि वाढत्या उष्णतेचा विचार करता 2050 पर्यंत भारतात सर्वात जास्त एसीचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे एसीची मागणी जास्त असेल. इंटरनेशनल एनर्जी एजेंसीच्या अहवालानुसार 4206 टक्के किंमत वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

No comments

Powered by Blogger.