दाट धुक्यामुळं ओडिशामध्ये लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला अपघात; ४० जखमी

दाट धुक्यामुळं ओडिशामध्ये लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला अपघात

दाट धुक्यामुळं ओडिशामध्ये लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला अपघात झाला त्यात ४०जण  जखमी झाले  आहेत.मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरून घसरून झालेल्या अपघातात ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. सालागाव-निरगुंडी स्थानकांदरम्यान हा सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळं मार्ग भरकटून लोकमान्य टिळक एक्स्प्रेस एका मालगाडीला धडकली. या धडकेनंतर गाडीचे सात डबे रुळावरून घसरले. त्यात अनेक जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनानं मदत व बचावकार्य हाती घेतलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

No comments

Powered by Blogger.