अरुण गवळी उर्फ डॅडीने घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव

अरुण गवळी उर्फ डॅडीने घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव
शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर अरुण गवळी उर्फ डॅडी सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या शिक्षेविरोधात आता डॅडीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टात न्यायाधीश आर. भानुमती आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी सुरु असून कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावत उत्तर देण्यास सांगितले. गवळीला दिलेले जन्मठेपेची शिक्षा गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. अरुण गवळी सध्या शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
याप्रकरणी सोमवारीन्या. आर. भानुमति आणि न्या. ए.एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकारलानोटीस बजावली आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलं होतं. या खटल्यातील १५ आरोपींपैकी अरुण गवळीसह १२ जणांना विशेष मोक्का कोर्टाने दोषी ठरवलं आहे. तर ३ जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली होती.
डॅडीसह इतर आरोपींना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवत आव्हान याचिका फेटाळली होती. हायकोर्टाच्या न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता.

No comments

Powered by Blogger.