लिलावात काढलेल्या टोपीला विक्रमी किंमत
![]() |
| लिलावात काढलेल्या टोपीला विक्रमी किंमत |
ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स स्टेटमध्ये पहिल्यांदा आग लागली. राजधानी मेलबर्न आणि सिडनी याच राज्यात समुद्र किनाऱ्यावर आहेत. इथं 70 लाख लोक राहतात. वेल्सनंतर आग विक्टोरियापर्यंत पोहचली. गेल्या आठवड्यात मल्लकूटातील जंगलाला आगा लागली. यामुळे शहरातील 4 हजार लोकांना स्थलांतर करावं लागलं. जवळपास 1.23 कोटी एकर क्षेत्र आगीत भस्मसाथ झालं आहे. सिडनीच्या ओपेरा हाऊसपेक्षाही आगीचे लोट उंच असल्याचं म्हटलं जात आहे. ही आग विझवण्यासाठी 74 हजार कर्मचारी काम करत आहेत. आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.
ऑस्ट्रेलियात गेल्या चार महिन्यांपासून भडकलेल्या आगीत आतापर्यंत 50 कोटी प्राण्यांना जीव गमवावा लागला. जंगले जळून खाक झाली आहेत. आता या प्राण्यांसाठी लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नने त्याच्या बॅगी ग्रीन कॅपचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. शेन वॉर्नच्या या लिलावाच्या घोषणेनंतर बॅगी ग्रीनवर मोठी बोली लावण्यात आली. एक दिवस बाकी असतानाच या कॅपवर विक्रमी 6 लाख डॉलर्सची बोली लागली होती. त्याने डॉन ब्रॅडमन आणि धोनी यांनाही याबाबतीत मागे टाकलं आहे.
डॉन ब्रॅडमन यांच्या बॅगी ग्रीन कॅपचा लिलाव जानेवारी 2003 मध्ये झाला होता. तेव्हा 4 लाख 25 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच जवळपास 3 कोटी 6 लाख रुपयांत लिलाव झाला होता. 2003 मध्ये मिळालेली ही विक्रमी किंमत होती. ब्रॅडमन यांच्यानंतर धोनीच्या बॅटला विक्रमी किंमत मिळाली होती. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये धोनीने ज्या बॅटने षटकार मारून विजय मिळवला होता त्याला एक लाख युरो इतकी किंमत मिळाली होती.
वॉर्नच्या टोपीला त्यापेक्षा जास्त किंमत मिळाली आहे. शेन वॉर्नची टोपी 10 लाख 7 हजार 500 ऑस्ट्रेलियन डॉलरला म्हणजेच जवळपास 4 कोटी 92 लाख 8 हजार रुपयांना विकण्यात आली.

Post a Comment