बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट यादीतुन माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वगळल
बीसीसीआयने आगामी मोसमासाठी टीम इंडियाच्या संभाव्य शिलेदारांची कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर केली असून, या यादीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश करण्यात आलेला नाही.
बीसीसीआयने आगामी मोसमासाठी टीम इंडियाच्या संभाव्य शिलेदारांची कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर केली असून, या यादीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश करण्यात आलेला नाही. बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट यादीत ए प्लस, ए, बी, सी या चार श्रेणींचा समावेश आहे. गत मोसमात धोनीचा समावेश पाच कोटी रुपयांचं वार्षिक मानधन असलेल्या ए श्रेणीत होता. पण यंदा त्याला एकाही श्रेणीच्या कॉन्ट्रॅक्ट यादीत समावून घेण्यात आलेलं नाही.
बीसीसीआयने ए श्रेणीत अकरा खेळाडूंचा समावेश केला असून, त्यांना पाच कोटी रुपयांचं वार्षिक मानधन देण्यात येईल. या यादीत कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव आणि ऋषभ पंतचा समावेश आहे.
बीसीसीआयनं बी श्रेणीत पाच खेळाडूंचा समावेश केला आहे. या यादीत वृद्धीमान साहा, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल यांचा समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूंना वार्षिक तीन कोटी रुपयांचं वार्षिक मानधन दिलं जाणार आहे.
सी श्रेणीत एकूण आठ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूंना एक कोटी रुपयांचं वार्षिक मानधन देण्यात येईल. या यादीत केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पांडे, हनुमा विहारी, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
![]() |
बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट यादीतुन माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वगळल |

Post a Comment