रिंकू राजगुरू, चिन्मय उद्गीरकर यांचा 'गाठी गं' गाने प्रदर्शित

कुटुंबियांच्या, जीवलगांच्या उपस्थितीत नील आणि पूर्वीचा साखरपुडा धूमधडाक्यात संपन्न झाला. या दिनाचा योग साधत 'मेकअप' चित्रपटातील 'गाठी गं' हे जोशपूर्ण गाणेही नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.

http://www.esuper9.com/2020/01/gaathi-g-song-released.html
रिंकू राजगुरू, चिन्मय उद्गीरकर यांचा 'गाठी गं' गाने प्रदर्शित
साखरपुडा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक साखरेसारखा अद्वितीय गोड सोहळा. आयुष्यातील हा अनमोल क्षण नील आणि पूर्वीच्या आयुष्यातही आला आहे. कुटुंबियांच्या, जीवलगांच्या उपस्थितीत नील आणि पूर्वीचा साखरपुडा धूमधडाक्यात संपन्न झाला. या दिनाचा योग साधत 'मेकअप' चित्रपटातील 'गाठी गं' हे जोशपूर्ण गाणेही नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.

पूर्वी आणि नीलच्या साखरपुड्यावर आधारित या गाण्याला शाल्मली खोलगडे हिने आपल्या सुमधुर आवाजाने चार चाँद लावले आहेत. वैभव देशमुख यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले असून ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. तर या गाण्याला विठ्ठल पाटील यांचे नृत्यदिग्दर्शन लाभले आहे. साखरपुड्याचा आनंद नीलच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसतोय. तर आनंदासोबतच मनातील चलबिचल रिंकूच्या चेहऱ्यावर दिसत आहे. सर्वांनाच ठेका धरायला लावणारे हे गाणे प्रत्येकाच्या 'त्या' सोनेरी आठवणींना नक्कीच उजाळा देईल.

या चित्रपटात रिंकू राजगुरू, चिन्मय उद्गीरकर, प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर सहनिर्मितीची धुरा केतन मारू, कलीम खान यांनी सांभाळली आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


No comments

Powered by Blogger.