नितीन गडकरींना धक्का.....

नितीन गडकरींना धक्का

नागपूर,8 जानेवारी:नागपूरसह राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर बुधवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. दरम्यान, सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नागपुरात गड राखण्यासाठी भाजपची तारेवरील कसरत
नागपूर जिल्हा परिषद निवडणूक ही भाजपसाठी अस्तित्वाचा लढाई मानली जात आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठीही निवडणूक महत्त्वाची आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी 270 उमेदवार रिंगणात आहेत. तर 13 पंचायत समित्यांच्या 116 गणांसाठी मतदान झाले. नागपूरमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 12 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या, तर फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती. मात्र 2019 मध्ये चित्र पालटलं. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून पाच जागा मिळवल्या.
live Update-
- नागपूर जिल्हा परिषद – एकूण जागा 58
- पारडसिंगा जिल्हा परिषद – चंद्रशेखर कोल्हे, राष्ट्रवादी विजयी,
- एकूण 13 पंचायत समित्या, 116 गण
– पारडसिंगा शेकाप उमेदवार धम्मापाल खोब्रागडे विजयी
- लाडगाव – राष्ट्रवादी निलिमा ठाकरे विजयी
- चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलल्याने मतदारांची भाजपवर नाराजी कायम
- चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी या मुळ गावातंही भाजप विरोधी मतदान, कोराडीतून काँग्रेसचे नाना कंभाले विजयी
- काँग्रेस - पाच विजयी
- राष्ट्रवादी- तीन विजयी
*आघाडी
-काँग्रेस - चार आघाडीवर
-राष्ट्रवादी - तीन आघाडीवर
-शिवसेना - दोन आघाडीवर
-भाजप - चार आघाडीवर


No comments

Powered by Blogger.