स्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न
![]() |
स्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न |
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला .त्यामळे सर्व पक्षातील आमदारांचा गोंधळ उडाला. पूर्व कल्पना नसल्यामुळे यावर कोणी काय भाष्य करायचे याबाबत सर्वाणी सावध भूमीका घेतली.
या आधी ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी स्वर्गीय केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे व नंतर आता त्यांची कन्या खासदार प्रीतम गोपीनाथ मुंडे हे आग्रही होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, 'विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीत हा विषय घ्यावा, जेणेकरून सर्वच पक्षांच्या गटनेत्यांना या विषयावर बोलता येईल. सर्वंकष चर्चा करून हा ठराव अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडू या'.मात्र,अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी यावर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

सन २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याची केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव विधानसभेने एकमताने मंजूर केला. या ठरावास सर्व पक्षांनी पाठिंबा दिला.
Post a Comment