आता इंटरनेट स्पीड वाढणार, GSAT-30 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण केले असल्याची माहिती आहे.

http://www.esuper9.com/2020/01/gsat-30-launched-by-isro.html
आता इंटरनेट स्पीड वाढणार, GSAT-30 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण केले असल्याची माहिती आहे. आज पहाटे २ वाजून ३५ मिनिटाने दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील कैरो बेटावरून हे प्रक्षेपण यशस्वीपणे करण्यात आले. या नव्या आणि आधुनिक उपग्रहामुळे येणाऱ्या काळात इंटरनेटचा स्पीड अधिक गतीने वाढणार आहे.

 

GSAT-30चं वजन सुमारे ३१०० किलो असून लॉन्चिंगपासून १५ वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे. या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं आहे. यात दोन सोलर पॅनल आणि बॅटरी असून त्यामुळे ऊर्जा मिळणार आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार जीसॅट-३० हा एक दूरसंचार उपग्रह आहे. हा उपग्रह इनसॅट-४एच्या जागी काम करेल. इनसॅट-४ या उपग्रहाची मर्यादाही संपुष्टात येत असून तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे अधिक शक्तिशाली आणि आधुनिक उपग्रहाची आवश्यकता होती. त्यामुळेच इस्रोने जीसॅट-३०चं आज यशस्वी उड्डाण केलं आहे.विशेष म्हणजे या उपग्रहामुळे मोबाइल सेवा ज्या क्षेत्रात अद्याप पोहचू शकलेल्या नाहीत, त्या क्षेत्रात या नव्या उपग्रहामुळे मोबाइल सेवा पोहचू शकणार आहेत. या व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे.

No comments

Powered by Blogger.