'झुंड' चं Teaser रिलीज

'फुरसत से आया है झुंड रे...', बिग बींचा बहुचर्चित Jhund Teaser  रिलीज
'झुंड' चं Teaser रिलीज
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगमी सिनेमांच्या शूटिंगमध्ये बीझी आहेत. यावर्षी त्यांचे एक-दोन नव्हे तर तब्बल 5 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे यंदाचं वर्ष बिग बी गाजवणार हे निश्चत. अशातच त्यांच्या बहुचर्चित 'झुंड' या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला. सध्या सोशल मीडियावर या टीझरची जोरदार चर्चा सुरू आहे.
अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला झुंड हा सिनेमा प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये काही मुलांचा घोळका हातात बॅट, चैन आणि हॉकी स्टीक इत्यादी घेऊन चालताना दिसत आहे. तर बॅकग्राउंड म्युझिकसोबत 'झुंड नाही सर टीम कहीए टीम' असा अमिताभ यांचा दमदार डायलॉग ऐकू येतो.

No comments

Powered by Blogger.