'आप'वर ५०० कोटींचा दावा

'आप'वर ५०० कोटींचा दावा

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. 'आप'ने शनिवारी ट्विट केलेल्या एका गाण्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या गाण्यावरून भाजपने आम आदमी पार्टी विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून ५०० कोटींचा दावा ठोकला आहे.

भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आपवर या व्हिडिओवरून जोरदार टीका केली आहे. आपने ट्विट केलेल्या व्हिडिओ मनोज तिवारी आहेत. एका भोजपुरी अल्बममधील मूळ गाण्यात बदल करून 'आप'ने 'लगे रहो केजरीवाल' हे आपचे प्रचारगीत व्हिडिओला लावले असल्याचे तिवारी यांनी सांगितले. भोजपुरीतील मूळ व्हिडिओत मनोज तिवारी थिरकताना दिसत आहेत.
आम आदमी पक्षाला त्यांच्या प्रचार गीतासाठी माझ्या व्हिडिओचा वापर करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवालही तिवारी यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडिओची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. तर, अब्रु नुकसान झाल्याप्रकरणी ५०० कोटी रुपयांचा दावा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आम आदमी पक्षाला भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या चेहऱ्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे तिवारी हे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचे 'आप' मान्य करत असल्याचे भाजप नेते नीलकांत बक्षी यांनी म्हटले.
 

No comments

Powered by Blogger.