फोन टॅप हो रहे है, भाजपा मंत्र्याचीच माहिती

फोन टॅप हो रहे है, भाजपा मंत्र्याचीच माहिती

“तुमचा फोन टॅप होत आहे, ही माहिती मला भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं दिली होती. जर माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल तर त्यांचं स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. मी कोणत्याही गोष्टी लपून करत नाही. ऐका माझं बोलणं,” अशा आशयाचं ट्विट राऊत यांनी केलं आहे.
तुमचे फोन टॅप होत आहेत, अशी माहिती एका भाजपाच्याच मंत्र्यानं दिली असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात काही जणांचे फोन टॅप करण्यात आल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. या चर्चांदरम्यानच संजय राऊत यांनी ट्विटरवरून हा दावा केला आहे.
महाविकास आघाडी सरकारनं यापूर्वी झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केला होता. दिग्विजय सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे फोन टॅप झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

No comments

Powered by Blogger.