राज ठाकरेंच्या नेतृत्वात मोहम्मद अली रोडवरुन निघणार मनसेचा मोर्चा?

राज ठाकरेंच्या नेतृत्वात मोहम्मद अली रोडवरुन निघणार मनसेचा मोर्चा?
बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावा या मागणीसाठी अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा भायखळा जिजामाता उद्यान ते आझाद मैदानपर्यत काढण्यात येईल. यासाठी मनसेने मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. मात्र मनसेच्या या मोर्चामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे मनसेच्या मोर्चाला पोलीस परवानगी देणार का? हा प्रश्न आहे.

देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मुस्लीम समुदाय रस्त्यावर उतरला असून मनसेच्या मोर्चाचा मार्ग हा मुस्लीम बहुल भागातून जाणार आहे. त्यामुळे या मोर्चामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते. तसेच राज ठाकरेंच्या सुरक्षेचा प्रश्नही पोलिसांसमोर आहे. त्यामुळे मनसेच्या मोर्चाला अन्य मार्गावरुन जाण्यास परवानगी दिली जाऊ शकते. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनसेने पोलिसांकडे परवानगी मागितली असून पोलीस योग्य तो निर्णय घेतील असं सांगितलं आहे.

No comments

Powered by Blogger.