सुरत इथे 10 मजली कपड्यांच्या मार्केटला भीषण आग

सुरत इथे 10 मजली कपड्यांच्या मार्केटला भीषण आग
गुजरातमधील सुरत इथे रघुवीर टेक्सटाइल मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. पुना-कुंभारिया रोड परिसरात लागलेल्या या आगीने रौद्र रुप घेतल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशामक दलाच्या 57 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे 200 जवान आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. सुरत, बारडोली, कुंभारिया, होळीवाला, हजीरा येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर आहे.
सरोली परिसरातील संपूर्ण 10 मजली कापड्याचा बाजार आगीने भडकला आहे. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. काही दिवसांपूर्वी या बाजाराच्या 9 व्या मजल्यावर आग लागली होती. त्याचबरोबर या घटनेत झालेल्या जीवितहानीची माहितीही या क्षणी जाहीर केलेली नाही. पण आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विझवण्यामध्ये अडचण येत आहे.

No comments

Powered by Blogger.