स्वराज्य सिंहांची बॉक्सऑफिसवर गर्जना

   तान्हाजी- द अनसंग वॉरिअर सिनेमाने पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचा आकडा पार केला आहे. 

 
स्वराज्य सिंहांची बॉक्सऑफिसवर गर्जना
अजय देवगण- काजोल आणि सैफ अली खान स्टार तान्हाजी- द अनसंग वॉरिअर सिनेमाने पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचा आकडा पार केला आहे. फक्त सहा दिवसांमध्ये अजय- सैफच्या या सिनेमाने १०७.६८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या वर्षातला १०० कोटी रुपयांचा आकडा पार करणारा तान्हाजी हा पहिला सिनेमा ठरला आहे.

 

सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्शने तान्हाजीच्या कमाईचे आकडे शेअर करत म्हटलं की, 'तान्हाजी १०० कोटींच्या क्लबमध्ये नाबाद कलेक्शन करत आहे. सिनेमाने सहाव्या दिवशी चौथ्या आणि पाचव्या दिवसाच्या तुलनेत जास्त कमाई केली. वीकडेमध्ये सिनेमा ज्याप्रकारे कमाई करत आहे, यावरून सिनेमाच्या कथेत किती ताकद आहे ते दिसतं. सिनेमा लवकरच १५० कोटींची कमाईही करेल.'

 

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये तान्हाजी सिनेमा करमुक्त केला. यानंतर  हरियाणामध्येही अजय देवगणचा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातही 'तान्हाजी' करमुक्त करण्यात आला आहे

No comments

Powered by Blogger.