उमराणे-देवळा बसला भीषण अपघात
![]() |
उमराणे-देवळा बसला भीषण अपघात |
नाशिकमध्ये कळवणजवळ एसटी महामंडळाची बस आणि रिक्षा विहिरीत कोसळल्यामुळे
आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 19 प्रवाशी बेपत्ता आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.नववर्षाच्या पहिल्या महिन्यात महाराष्ट्राला हादरावून सोडणारी अपघाताची घटना नाशिकमध्ये घडली आहे.
कळवण डेपोची एसटी महामंडळाची उमराणे-देवळा बस मालेगाव येथून धोबीघाट
मेशीकडे जात होती. दुपारी 3.30 च्या सुमारास धोबीघाटजवळील देश-विदेश
हॉटेलजवळ बस पोहोचली असता अचानक टायर फुटले. त्यानंतर बस चालकाचे बसवरील
नियंत्रण सुटले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका अॅपे रिक्षाला बसने धडक
दिली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या परिसरात वळली. तिथूनच जवळ एक
विहीर होती. त्यावेळी बस थेट रिक्षाला फरफटत नेते विहिरीच्या कठड्याला
धडकली. मात्र, बसचा वेग जास्त असल्यामुळे कठडा तोडून बस आणि रिक्षा
विहिरीत कोसळली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. बसची मागील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर 5 क्रेनच्या मदतीने विहिरीतून बस बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.
जखमी झालेल्या काही प्रवाशांना मालेगाव देवळा तर काहींना उमराणे येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेपत्ता असलेल्या प्रवाशांचा शोध सुरू आहे.
बसमधून बचावलेल्या महिला प्रवाशाची प्रतिक्रिया
दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघात झाला तेव्हा नेमकं काय घडलं याबद्दल कळालचं नाही. फक्त विहिरीकडे बस जाताना दिसली होती. नेमकं काय घडतंय याबद्दल काहीच कळलं नाही. विहिरीमध्ये बस पडल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. लहान-लहान मुलं होती. सगळे जण वाचवा वाचवा ओरडतं होती. मी कशी बशी खिडक्याला पकडून बाहेर आली.
Post a Comment