झी मराठीवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप


झी मराठीवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
झी मराठीवरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. यात माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला, स्वराज्य रक्षक संभाजी आणि अग्गंबाई सासूबाई या मालिकांनी अल्पावधीत रसिकांची मनं जिंकली आहेत. यात पैकी एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार असल्याची माहिती आमच्या सूत्रांनी दिली आहे. 
आम्ही बोलतोय डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेबाबत. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली आता मात्र प्रेक्षकांची लवकरच ती निरोप घेणार आहे. उद्या या मालिकेचा शेवटचा एपिसोड शूट केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2018 ला सुरु झालेल्या या मालिकेने रसिकांच्या मनावर जवळपास 2 वर्षे अधिराज्य गाजवले. या मालिकेतून संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला.


खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे. संभाजी मालिका नेहमीच टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल स्थानावर राहिली.  डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली  संभाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
संभाजी प्रमाणेच शंतून मोघेने साकारलेली  शिवाजी महाराजांची भूमिका प्राजक्ता गायकवाड साकारत असलेली येसूबाईंची भूमिकेला ही प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. फेब्रुवारीमध्ये या मालिकेचा अखेरचा भाग दाखवण्यात येणार असल्याची माहिती आहे. आता या मालिकेची जाग नवीन कोणती मालिका घेणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

No comments

Powered by Blogger.