आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०७ फेब्रुवारी २०२०


 1. मेष:-लहान प्रवास घडेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. तुमची बौद्धिक क्षमता वाढेल. सद्गुणांचा विकास करता येईल.
 2. वृषभ:-जोडीदाराचा वरचष्मा राहील. मतवैचित्र दर्शवू नका. कौटुंबिक वाद वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. कोर्ट-कचेरीची कामे पुढे ढकलावीत. भागीदाराशी सलोख्याचे संबंध ठेवावेत.
 3. मिथुन:-प्रेमसंबंधात वाढ होईल. आर्थिक लाभाचा विचार करावा. प्रवासाचे योग येतील. नवीन स्नेहसंबंध जुळून येतील. ठाम निर्णयाची गरज भासेल.
 4. कर्क:-आरोग्यात सुधारणा होईल. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. पचनाचे विकार संभवतात. जोडीदाराच्या मताचा पुनर्विचार करावा. भागीदारीतील धोरण नीट जाणून घ्या.
 5. सिंह:-प्रेमसंबंध सुधारतील. मुलांचे कौतुक कराल. व्यवसायात चांगले आर्थिक लाभ होतील. तुमची धार्मिकता वाढेल. चांगले साहित्य वाचाल.
 6. कन्या:-कौटुंबिक स्वास्थ लाभेल. नातेवाईकांचा विरोध संभवतो. लहान-सहान कुरबुरी राहतील. घरासाठी मोठ्या वस्तू खरेदी कराल. चांगले वाहन सौख्य लाभेल.
 7. तूळ:-दूरच्या प्रवासाचा योग येईल. भावंडांचे प्रश्न सोडवावे लागतील. ग्रंथ वाचन कराल. यात्रा कंपनीची सवलत मिळेल. बोलतांना सारासार विचार करावा.
 8. वृश्चिक:-रागावर नियंत्रण ठेवावे. औद्योगिक वाढीचा विचार करावा. कौटुंबिक कार्यक्रम होतील. हातात नवीन अधिकार येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल.
 9. धनु:-तुमच्यातील आशावाद वाढेल. सामाजिक दर्जा सुधारता येईल. शैक्षणिक कामात प्रगती करता येईल. ऐहिक गोष्टींची ओढ वाढेल. बौद्धिक चुणूक दाखवता येईल.
 10. मकर:-मनातून नैराश्य दूर सारावे. कामाची धांदल राहील. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. कमिशनच्या व्यवसायातून लाभ संभवतो. व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल.
 11. कुंभ:-फार हट्टीपणा करू नका. आपले विचार उत्तम प्रकारे मांडावेत. कामात तत्परता दाखवाल. अतिचिकित्सा करणे टाळावे. मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा.
 12. मीन:-कल्पनाशक्तीला चांगली भरारी मिळेल. घरी मोठ्या लोकांचा वावर राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. घरातील कामात व्यग्र राहाल.

No comments

Powered by Blogger.