#BoycottTakht करण जौहरचा ‘तख्त’ वादात

करण जौहरच्या ‘तख्त’ या चित्रपटाचं लेखन हुसैन हैदरी या लेखकाने केले आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ‘हिंदू दहशतवादी’ असे ट्विट केले होते. हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत, ते वापरा… असं म्हणत त्याने ‘हिंदू दहशतवादी’ हा शब्द ११ वेळा लिहिला होता. हे ट्विट काही तासांत व्हायरल झाले आणि नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर हुसैनच्या आगामी चित्रपटाची माहिती मिळताच नेटकऱ्यांच्या संतापाचा रोख करण जौहरच्या दिशेने वळला आणि त्यांनी ‘तख्त’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. बॉलिवूड निर्माता करण जौहर आपला नवाकोरा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘तख्त’ असे आहे. मात्र चित्रीकरणापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाच्या लेखकाने आपल्या ट्विटमध्ये ‘हिंदू दहशतवादी’ असा उल्लेख केला होता. परिणामी नेटकरी संतापले आहेत. त्यांनी #BoycottTakht असा हॅशटॅग व्हायरल करुन ‘तख्त’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

No comments

Powered by Blogger.