रनवेवर घसरून विमानाचा अपघात ,जागीच झाले 3 तुकडे, प्रवाशांच्या डोळ्यासमोर होता मृत्यू
![]() |
रनवेवर घसरून विमानाचा अपघात ,जागीच झाले 3 तुकडे, प्रवाशांच्या डोळ्यासमोर होता मृत्यू |
इस्तंबूल, 06 फेब्रुवारी : तुर्की (Turkey) येथील इस्तंबूलच्या विमानतळावर एक धक्कादायक प्रकार घडला. धावपट्टीवर विमान उतरत असतानाच विमानाच अपघात झाला. यावेळी विमानत तब्बल 183 प्रवासी होते. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे तर 157 प्रवासी जखमी झाले आहेत. इस्तंबूलचे आरोग्यमंत्री फहारेटीन कोका यांनी ही माहिती दिली.
फहारेटीन कोका यांनी, बुधवारी इस्तंबूलच्या सबिहा गोकसेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीवर विमान घसरल्याने एकाचा मृत्यू झाला असल्याच सांगितले. तर, दोन जणांना आयसीईयूमध्ये ठेवले गेले आहे, परंतु त्यातील कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही आहे. इस्तंबूलचे राज्यपाल अली यार्लिकया यांनी एका नवीन ट्वीटमध्ये सांगितले की, स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6.19 मिनिटांनी हा अपघात झाला. यावेळी तुर्की पेगासस एअरलाइन्सचे हे विमान 183 प्रवाशांनी भरले होते. हे विमान उतरल्यानंतर लगेचच धावपट्टीवरून घसरले. यापूर्वी विमानतळावर त्यांनी पत्रकारांना सांगितले की खराब हवामानामुळे विमान धावपट्टीवर नीट उतरले नाही आणि 30 ते 40 मीटर उंचीवरून खाली पडले. सीएनएनच्या वृत्तानुसार, विमानात तीन तुकडे झाल्यानंतर आग लागली.
Post a Comment