मेंदूचा कर्करोगावर मात करत इरफान खानचं दमदार कमबॅक

मेंदूचा कर्करोगावर मात करत इरफान खानचं दमदार कमबॅक
अभिनेता इरफान खानची प्रमुख भूमिका असलेला अंग्रेजी मीडियम हा सिनेमा मागच्या काही काळापासून वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे. या सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ज्यात हिंदी मीडियममध्ये शिकलेला इरफान खाननं आपल्या मुलीच्या परदेशातील शिक्षण घेण्याच्या स्वप्नासाठी झटणाऱ्या बापाची भूमिका साकारली आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीला इरफान खान त्याच्या मुलीच्या शाळेत भाषण देताना दिसत आहे. त्यानंतर त्याची मुलगी त्याला परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा बोलून दाखवते. मात्र समस्या असते ती या शिक्षणासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा. पण इरफान आपल्या मुलीला आश्वासन देतो की, वेळ पडल्यास रक्त विकून तुझ्या फीचा पैसा उभा करेन. पण 3 कोटीची रक्कम जमवणं सोपी गोष्ट नसते... त्यात अनेक समस्या येतात. हा ट्रेलर तुम्हाला हसवतो, विचार करायला लावतो. काही प्रसंगी डोळ्यात पाणीही आणतो आणि पुन्हा हसवण्यात यशस्वी ठरतो.

No comments

Powered by Blogger.