अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला फेकून मारले पंचिंग मशीन, फुटले डोके
![]() |
अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला फेकून मारले पंचिंग मशीन, फुटले डोके |
जिल्हा उम्मेद अभियानात ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या झालेला वाद विकोपाला गेला. यात अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला थेट पंचिंग मशीन फेकून मारले. यात कर्मचारी मुरहरी सावंत यांचे डोके फुटले आहे. मिळालेली माहिती अशी की, ही प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. मात्र, बुधवारी आरोपी अधिकाऱ्याच्या विरोधात शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुजोर अधिकाऱ्याला निलंबित करा...
या प्रकरणात मारहाण करणारा मुजोर अधिकारी जिल्हा ऊम्मेद अभियान व्यवस्थापक बलबीर शंकर मुंडे यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी पीडित कर्मचाऱ्याने केली आहे. ऑफिसमधील कामकाजावरून आरोपी बलबीर मुंडे आणि मुरहरी सावंत यांच्यात हमारी तुमरी झाली. यात मुंडे यांनी सावंत यांना पंचिंग मशीन फेकून मारले. यात सावंत यांचे डोके फुटले आहे. या जखमी कर्मचाऱ्यांवर जिल्हा रुग्णलयात उपचार सुरु आहेत.या अधिकाऱ्यांना विरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याने शिव्या देऊन जीवे मरण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित कर्मचाऱ्याने केला आहे. आधीपासून मानसिक त्रास व खालच्या भाषेत बोलणे, अडचणीत आणण्याची धमकी देणे, असाही आरोप अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. यामुळे आरोपीला अटक करुन न्याय मिळावा, अशी मागणी केली. या पंचिंगच्या प्रकरणाची चर्चा जिल्हाभरात होत आहे.
Post a Comment