एक लाख बेलपत्रांनी सजलं विठुमाऊलीचं मंदिर



फोटो सौजन्य - मंदिर समिती

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाशिवरात्री निमित्त बेलाच्या पानांची आरास. समितीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक फुलांनी सजवलं आहे. महादेवाला प्रिय असलेल्या बेलाच्या पानांची आरास करण्यात आली आहे. श्री विठ्ठल आणि रूख्मिणीमातेचे गर्भगृह, प्रवेशद्वार आदि ठिकाणी हि आरास केल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. बेलाच्या पानांची आरास घातल्यामुळे देवाचे रुप अधिकच खुलून दिसतेय.सजावट खर्च करणाऱ्या भाविकांचे नांव - आनंद कटप.सजावटीसाठी एक लाख बेलपत्राचा वापर करण्यात आला आहे. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. मंदिराची सजावट साई डेकोरेशन शिंदे ब्रदर्स यांनी केली आहे. 

No comments

Powered by Blogger.