चीनची पाकिस्तान विरोधात भारताला साथ
पाकिस्तानची नेहमीच पाठराखण करणाऱ्या चीनने आता दहशतवादाच्या मुद्दावरुन
त्यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. चीनच्या भूमिकेत झालेला हा मोठा बदल
आहे. मनी लाँड्रिंग आणि दहशतवादाला आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात
पाकिस्तानने ठोस कारवाई करावी, यासाठी फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सकडून
पाकिस्तानला जूनपर्यंतची मुदत देण्यात येणार आहे.
भारत, अमेरिका आणि युरोपियन देशांच्या बरोबरीने चीन आणि सौदी अरेबियाही या प्रस्तावाला पाठिंबा देणार आहेत. जूनमध्ये होणाऱ्या FATF च्या बैठकीआधी पाकिस्तानला त्यांच्या भूमीवरील दहशतवादी संघटना, त्यांच्या म्होरक्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनवावी लागणार आहे. पाकिस्तानला कठोर संदेश देण्याचा उद्देश यामागे आहे.
फक्त टर्की या एकमेव देशाने पाकिस्तानने समर्थन केले आहे. चीनच्या भूमिकेत झालेला बदल अंत्यत महत्वपूर्ण आहे. कारण चीनने नेहमीच FATF मध्ये पाकिस्तानचे समर्थन केले आहे. पाकिस्तान FATF च्या ग्रे लिस्टमध्ये राहणार हे आता ठरलं आहे. पाकिस्तानने जूनपर्यंत दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई केली नाही तर, त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. यासंबंधीची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. FATF च्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरु आहे. कारण ग्रे लिस्टमधल्या देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मदत मिळण्याचे मार्ग बंद होतात. सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे त्यांना मदतीची आवश्यकता आहे.

Post a Comment