आपची बंपर बहुमताकडे वाटचाल....
![]() |
आपची बंपर बहुमताकडे वाटचाल.... |
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होत आहे. दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होणार,... पुन्हा केजरीवाल सरकार कमबॅक करणार का?... भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची कामगिरी कशी असेल?.... आपची हॅटट्रिक भाजप रोखणार का?... मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खरे ठरणार का?.... या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत. पाहुयात दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स...
- दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया सुमारे दीड हजार मतांनी पिछाडीवर
- ओखला येथून आम आदमी पक्षाचे अमानतुल्ला खान १९४ मतांनी पिछाडीवर, भाजप उमेदवार ब्रह्मसिंह यांनी घेतली आघाडी. (शाहीन बाग यात मतदारसंघात आहे)
आपची बहुमताकडे वाटचाल, मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जागांच्या तुलनेत यंदा जागा झाल्या कमी
- निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, आतापर्यंत ६८ जागांचे कल हाती आले असून आम आदमी पक्षाला ५० जागांची आघाडी, तर भारतीय जनता पक्षाला १८ जागांवर आघाडी
- नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल ४३८७ मतांनी आघाडीवर
-- किराडी मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार ऋतुराज यांनी घेतली आघाडी
- शकूरबस्ती मतदारसंघात आप सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन पिछाडीवर, एस. सी. वत्स यांनी घेतली आघाडी, तर राजेंद्रनगरहून आपचे राघव चड्ढा आघाडीवर
-पटपडगंजमधून आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया ११२ मतांनी आघाडीवर
-भारतीय जनता पक्षाला मागे सारत आम आदमी पक्षाची जोरदार मुसंडी.... आपच्या कार्यालयात जल्लोष सुरू
- निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, आतापर्यंत ६८ जागांचे कल हाती आले असून आम आदमी पक्षाला ५० जागांची आघाडी, तर भारतीय जनता पक्षाला १८ जागांवर आघाडी
- नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल ४३८७ मतांनी आघाडीवर
-- किराडी मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार ऋतुराज यांनी घेतली आघाडी
- शकूरबस्ती मतदारसंघात आप सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन पिछाडीवर, एस. सी. वत्स यांनी घेतली आघाडी, तर राजेंद्रनगरहून आपचे राघव चड्ढा आघाडीवर
-पटपडगंजमधून आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया ११२ मतांनी आघाडीवर
-भारतीय जनता पक्षाला मागे सारत आम आदमी पक्षाची जोरदार मुसंडी.... आपच्या कार्यालयात जल्लोष सुरू
-अरविंद केजरीवाल २०२६ मतांनी आघाडीवर
-दिल्लीत पुन्हा केजरीवाल सरकार येणं जवळपास निश्चित; आपला ५३ जागांवर आघाडी
- दिल्लीच्या सर्व ७० जागांचे कल हाती; आप ५३, भाजप १६ आणि काँग्रेस १ जागेवर पुढे
- सुरुवातीच्या कलांमध्ये आपचं अर्धशतक, ६८ पैकी ५२ जागांवर आघाडी, भाजप १५ जागांवर पुढे
- अरविंद केजरीवाल वडिलांसह पक्ष मुख्यालयात; व्हिडीओ मेसेजद्वारे कार्यकर्त्यांना शपथविधीबाबत माहिती देणार
-आपची ४६ जागांवर आघाडी, भाजप सध्या १३ जागांवर पुढे
- कल हाती आलेल्या ५३ पैकी ४० जागांवर आपची आघाडी, भाजप ११ जागांवर आघाडीवर
- ७० पैकी ५० जागांचे कल हाती; आप ३८, भाजप १० आणि काँग्रेसची २ जागांवर आघाडी
- सुरुवातीच्या कलांनुसार आम आदमी पक्षाने बहुमताचा आकडा (३६) गाठला, भाजप अजूनही १० जागांवर
- ७० पैकी ४४ जागांचे कल हाती; आपची ३२ जागांवर आघाडी घेत मोठी मुसंडी, भाजप (०९) प्रचंड पिछाडीवर
- ७० पैकी ३७ जागांचे कल हाती; आप २५, भाजप ०९, काँग्रेस ३ मतदारसंघात आघाडीवर
- पोस्टल मतमोजणीत काँग्रेस एका जागेवर आघाडीवर; ७० पैकी २७ जागांचे कल हाती
- अरविंद केजरीवाल (नवी दिल्ली) आणि मनीष सिसोदिया (पटपडगंज) आघाडीवर
-७० पैकी २४ कल हाती, आप १७, भाजप ७ जागांवर पुढे
- दिल्ली विधानसभा निवडणुकीचा पहिला कल हाती- आपला ७ जागांवर आघाडी, भाजप ३ जागांवर पुढे
- मतमोजणीला सुरुवात, काही वेळातच येणार पहिला कल हाती
पुन्हा सत्तेत येण्याचा आप पक्षाचा दावा. 'अच्छे होंगे ५ साल, दिल्ली में तो केजरीवाल' असा नवा नारा आप पक्षाने आपल्या कार्यालयातील भिंतीवर लावला आहे.
- आज दिल्लीतील एकूण ६७२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार... थोड्याच वेळात पहिला कल होणार स्पष्ट
२०१५ मधील दिल्ली विधानसभेतील पक्षीय बलाबल
आप – ६७
भाजप – ०३
काँग्रेस – ००
एकूण – ७०
>> भारतीय जनता पक्षाला राज्यात ४८ जागा मिळतील असा दावा भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी केला आहे.
>> मतदानानंतर प्रसिद्ध झालेल्या चाचण्यांमध्ये आम आदमी पार्टी (आप) पुनरागमन करेल असा अंदाज आहे. या अंदाजानुसार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनू शकतात.
>> दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शाहीन बाग आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) या मुद्द्यांवर भर होता.
>> आज सकाळी ८ वाजल्यापासून होणार मतमोजणीला सुरुवात, त्यानंतर तासाभरात निकालाचे कल यायला सुरुवात होणार आहे
>> दिल्लीतील ७० जागांचे निकाल थोड्याच वेळात हाती यायला सुरू होणार
>> संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे.
Post a Comment