नगरच्या जेलमधून चार खतरनाक गुन्हेगारांचे पलायन

नगर:  कर्जत पोलीस स्टेशनच्या जेलमधून खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपी पसार झाले आहेत. ही घटना रात्री साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. 

पसार झालेले आरोपी
 अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत, (दोघे रा. जामखेड), ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे (रा. जवळा, जामखेड) व गंगाधर लक्ष्‍मण जगताप (रा.महाळंगी, तालुका कर्जत). 
कर्जत पोलीस स्टेशनच्या जेलमधील कस्टडी क्रमांक तीन येथे हे चारही आरोपी होते.  जेलच्या छतावरील प्लाऊड कटरच्या सहाय्याने कट करुन त्यानंतर कौल काढले आणि पलायन केले
पसारांमध्ये ज्ञानेश्वर कोल्हे जामखेड तालुक्यातील असून पिस्तूल आणि त्याची विक्री करणे यासह अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे
अक्षय रामदास राऊत व चंद्रकांत महादेव राऊत दोन्ही आरोपी मुंबईतील टरबूज व्यापाऱ्याच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटकेत होते
गंगाधर जगताप कर्जत तालुक्यातील आरोपी बलात्कार आणि  खुनाच्या गुन्ह्यांमध्ये होता,
हे सर्व आरोपी एकाच कस्टडीमध्ये ठेवले होते.

No comments

Powered by Blogger.