मुंबई रंगणार 24 रंगात

मुंबई रंगणार 24 रंगात
मुंबईत प्रत्येक प्रभागाला एक विशिष्ट रंग देण्याचा पालिका विचार करतेय. त्यामुळे उद्या दादर चे फूटपाथ  भगवे किंवा माहीम मध्ये हिरव्या रंगाचे बोर्ड दिसले तर नवल वाटून घेऊ नका. सध्या तरी कुठल्या प्रभागाला कुठला रंग दिला जाईल हे ठरवलं गेलं नसून त्यावर विचार केला जात आहे. या प्रस्तावानुसार मुंबईतल्या 24 प्रभागांपैकी पायलट प्रोजेक्ट म्हणून मुंबई शहरात येणाऱ्या 15  प्रभागाना हे विशिष्ट रंग दिले जाणार आहेत. फूटपाथ, फुटपाथच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी जाळ्या, रस्ते दुभाजक, भिंती, दिशादर्शक फलक अशा सगळ्या ठिकाणी एकच रंग लावला जाईल. पण हे रंग कोणते लावावे याबाबत मात्र अजूनही निर्णय घेतला गेला नाहीये.
सध्या तरी त्याबाबत वॉर्ड ऑफिसरना किती खर्च येईल याबाबत  अंदाजपत्रक तयार करायला सांगितलं गेलं आहे. हे अंदाज पत्रक तयार झाल्यावर मुंबई शहराच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला जाईल. कारण हा सगळा खर्चाचा भार जिल्हाधिकारी उचलणार आहेत. त्यानंतर वॉर्ड ऑफिसर, नगरसेवक यांच्या एकत्रीत संमतीने कोणत्या रंगात कोणता वॉर्ड न्हाऊन निघेल हे ठरवलं जाणार आहे.

No comments

Powered by Blogger.