भाजपाचे लोक जसे मुद्दाम एखादं वाक्य बोलतात तसं इंदुरीकर महाराज बोलत नाहीत - रोहित पवार

भाजपाचे लोक जसं मुद्दाम एखादं वाक्य बोलतात तसं इंदुरीकर महाराज बोलत नाहीत अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. इंदुरीकर महाराज हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी इंदुरीकर महाराजांनी मंगळवारी माफी मागितली आहे. त्यामुळे फार खोलात जाण्याची गरज नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. इंदुरीकर महाराजांनी ते वक्तव्य केलं त्यामागे त्यांचा काय हेतू होता? हे तपासलं पाहिजे असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. उस्मानाबद येथे ते बोलत होते.
“इंदुरीकर महाराज यांची कीर्तन करण्याची पद्धत साधी सोपी आहे. विविध उदाहरणांमधून ते त्यांचा मुद्दा पटवून देत असतात. व्यसनमुक्तीचे कामही इंदुरीकर महाराज करतात असंही रोहित पवार म्हणाले आहेत. उस्मानाबादमध्ये बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

No comments

Powered by Blogger.