सॅमसंगची S 20 मोबाइल सिरीज बाजारात दाखल

स्मार्टफोन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सॅमसंगने आपल्या 5 जी फ्लॅगशिप स्मार्टफोनची S20 सिरीज बाजारात दाखल केली आहे. गॅलॅक्सी S20 सिरीजचे एकूण तीन मॉडेल लाँच केले असून त्यात सॅमसंग गॅलॅक्सी S20, S20+ आणि S20 Ultra हे 5 जी नेटवर्कला सपोर्ट करणारे तीन नवे स्मार्टफोन आहेत.
सॅमसंग एस 20 मध्ये 128 जीबी वेरिएंटच्या LTE व्हर्जन सोबत ८ जीबी रॅम आहे. कॅमेऱ्यासाठी आर्टीफीशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञान वापरले असून याद्वारे 8 K व्हिडिओ रेकॉर्ड करणे शक्य होणार आहे. गॅलॅक्सी एस 20 सीरीजमध्ये 25w फास्ट चार्जिंग असून 4,000 MAH बॅटरी आहे. गॅलॅक्सी एस 20 कॉस्मिक ग्रे, क्लाउड ब्ल्यू, क्लाउड पिंक या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
सॅमसंग एस 20 प्लस मध्ये 4,500mah बॅटरी असून 128 जीबी वेरिएंटच्या LTE व्हर्जन सोबत ८ जीबी रॅम तर एस20प्लस 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी वेरिएंटमध्ये उपलब्धआहेत. सॅमसंग गॅलॅक्सी एस 20 प्लस कॉस्मिक ग्रे, क्लाउड ब्ल्यू, कॉस्मिक ब्लैक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
या सिरीजच्या अल्ट्रा वेरिएंट मध्ये १६ जीबीचा दमदार रॅम आहे. एस 20 अल्ट्रामध्ये 45w सुपरफास्ट चार्जिंग असून 5000 MAH बॅटरी, ची दमदार बॅटरी आहे. एस20 अल्ट्रा 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी वेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. गॅलॅक्सी अल्ट्रा कॉस्मिक ग्रे आणि कॉस्मिक ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या मोबाइल कम्युनिकेशन व्यवसायाचे प्रमुख आणि अध्यक्ष डॉ. टीएम रोह म्हणाले कि, गॅलॅक्सी एस20 चे तीनही वेरिएंट 5जी कनेक्टिव्हिटीसह आहेत, त्यामुळे सॅमसंग लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी नेक्स्ट जनरेशन चे डिव्हाईस आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहोत.
आर्टीफीशियल इंटेलिजेंस (AI) कॅमेरामुळे तुम्ही वास्तविक क्षणांना अधिक चांगल्या प्रकारे कॅप्चर करू शकता. गॅलॅक्सी एस20 आणि गॅलॅक्सी एस20 प्लसमध्ये तीन रियर कैमरे आहेत. ज्यात ६४ मेगा पिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि १०एमपी चा सेल्फी शूटरआहे, तसेच एस20 अल्ट्रामध्ये १०८ एमपीचा मुख्य कॅमेरा आणि ४० एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे.

No comments

Powered by Blogger.