पुण्यात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले

कोरोनाप्रमाणेच नवा व्हायरस समोर आला आहे. ब्राझीलमध्ये yaravirus सापडला आहे. कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता या yaravirus मुळे खळबळ उडाली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, ब्राझीलच्या वैज्ञानिकांनी या yaravirus निदर्शनास आणून दिला आहे. ब्राझीलच्या 2 शास्त्रज्ञांनी त्यांचा रिसर्च पेपर सादर करताना हा नवा व्हायरस निदर्शनास आणून दिला आहे. या व्हायरसमध्ये प्रोटीनच एकीकरण करण्याची क्षमता आहे.
पुण्यात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा 45 दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या 9 रुग्णांचं निदान झालं आहे. त्यापैकी दोघांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. N1H1 या संसर्गजन्य विषाणूंचं 8 जणांना निदान झालं आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. 45 दिवसांमध्ये आरोग्य विभागातर्फे 1 लाख 35 हजार संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यापैकी एक हजार 103 रुग्णांना लसीकरण देण्यात आलं आहे. त्यापैकी दोन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 2009 साली स्वाइन फ्लूने राज्यात मोठ्या प्रमाणात हाहाकार पसरवला होता. त्यानंतर पुन्हा एकदा स्वाइन फ्लू डोकं वर काढू पाहात आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी झालेल्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर कोरोनाची लागण झालेले रुग्णही वाढत आहेत भारतातही कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका असतानाच आता पुन्हा एकदा स्वाइन फ्लू डोकं वर काढताना पाहायला मिळत आहे.

No comments

Powered by Blogger.