जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत विदीत गुजराथी दुसऱ्या स्थानी
विश्वनाथन आनंद याच्यानंतर पेंटाल्या हरिकृष्ण याने भारताचा दुसऱ्या
क्रमांकाचा बुद्धिबळपटू म्हणून गेली अनेक वर्षे मान पटकावला होता. पण
नाशिकचा युवा ग्रँडमास्टर विदीत गुजराथी याने हरिकृष्णला मागे टाकत दुसऱ्या
स्थानी मजल मारली आहे.
अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीनुसार, विदीतने २७२१ एलो रेटिंग
गुणांसह भारतीयांमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. पाच वेळचा जगज्जेता आनंद
२७५५ गुणांसह अव्वल स्थानी आहे. हरिकृष्णला २७१३ गुणांसह तिसऱ्या
क्रमांकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत जगज्जेता मॅग्नस कार्लसन
अग्रस्थानी विराजमान आहे. तर आनंद १५व्या क्रमांकावर आहे.

Post a Comment