आजचे राशीभविष्य

मेषः कामकाजाच्या ठिकाणी रागावर संयम ठेवा. कनिष्ठ सहकाऱ्यांशी आपुलकीने वागा. जोडीदारासोबत प्रेमाचे क्षण घालवाल.
वृषभः घरातील ज्येष्ठांशी प्रेमाने बोला. शारीरिक व्यायाम अथवा योगाचे महत्त्व लक्षात घ्या. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील.
मिथुनः आर्थिक स्थितीमध्ये बदल घडतील, सकारात्मक ऊर्जेने कार्यरत राहाल, आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
सिंहः वैवाहीक जीवनात आनंदाचे प्रसंग येतील. व्यवसायात भागीदारी तूर्तास नको. कर्जाऊ रक्कम देणे नको.
कन्याः कौटुंबिक अथवा मित्रमंडळींसमवेत मौजमजा कराल. उत्तरार्धात आर्थिक आवक वाढेल, अचानक प्रवासामुळे दगदग होईल.
तुळः आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक समृद्धी आणेल. वैवाहीक आयुष्यात बहारदार क्षण येतील.
वृश्चिकः जोडीदाराची नाराजी ओढवेल, नात्यामध्ये कटूता टाळा, आर्थिक गुंतवणुकीतून योग्य तो मोबदला मिळेल.
मकरः तुमचे व्यक्तीमत्त्व आज बहरेल. सहनशीलतेने कार्यरत राहाल. कठोर बोलणे आणि सहकाऱ्यांशी असभ्य वर्तन अडचणी वाढवेल.
कुंभः स्पर्धात्मक परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. जोडीदाराच्या भावना समजून घ्या.
मीनः अचानक जुने मित्र भेटतील. मैदानी खेळांत सहभागी व्हाल.No comments

Powered by Blogger.