मेष:- वयाने लहान असणार्या लोकांशी मैत्री कराल. गप्पीष्ट लोकांच्यात
वावराल. कामाचे योग्य नियोजन कराल. जोडीदाराच्या साथीत रमून जाल. इतरांना
सहृदयतेने मदत कराल.
वृषभ:- व्यावसायिक ज्ञान वाढवाल. लेखक, प्राध्यापक यांना प्रगती करता
येईल. व्यवहारी हजरजबाबीपणा दाखवाल. हुशारीने स्वत:च फायदा काढून घ्याल.
योग्य कल्पकता दाखवाल.
मिथुन:- कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण राहील. तुमच्या वक्तृत्वावर लोक खूश
होतील. धोरणीपणे वागणे ठेवाल. काही गोष्टींची शिस्त बाळगावी लागेल.
प्रवासाची आवड पूर्ण कराल.
कर्क:- भावंडांच्या वागण्याचा सखोल विचार कराल. मेंदूला जरासा ताण द्यावा
लागेल. कफाचे त्रास संभवतात. अतिविचारात वेळ वाया जाईल. योग्य अनुमान
काढावे.
सिंह:- पत्नीची व्यवहार कुशलता दिसून येईल. जोडीदाराच्या सुस्वभावीपणाचे
कौतूक कराल. मानसिक स्थिरता जपावी. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.
विरोधकांवर मात करता येईल.
कन्या:- फसवेपणाचा आधार घेऊ नका. इतरांच्या विश्वासास पात्र व्हावे. जुनी
भांडणे उकरून काढली जातील. कोणाचाही सल्ला चटकन मान्य करू नका. अविचाराने
त्रास वाढू शकतो.
तूळ:- बौद्धिक क्षेत्रात काम करणार्यांना दिवस चांगला जाईल. खोट्या
गोष्टींचा विरोध करावा. घरगुती शांतता जपावी. प्रवास त्रासदायक ठरू शकतो.
वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक:- संभाषणात बाजी माराल. नवीन मित्र जोडले जातील. जवळचे नातेवाईक
भेटतील. तुमच्यातील प्रेमळपणा दाखवून द्यावा. भावंडांचे वागणे विरोधी वाटू
शकते.
धनू:- तुमच्यातील अहंमन्यता वाढू देवू नका. मनाची चलबिचलता सांभाळावी.
काही खर्च आटोक्यात ठेवावेत. वैचारिक चलाखी दाखवाल. नवीन गोष्टीत रुची
दाखवाल.
मकर:- स्थिरविचार करावेत. बोलतांना सावधगिरी बाळगावी. कलेसाठी वेळ काढाल. धार्मिक ठिकाणी मदत कराल. गैरसमजातून वाद वाढू देवू नका.
कुंभ:- गोष्टींचे आकलन चटकन होईल. बुद्धिचातुर्याने वागाल. स्मरणशक्तीचा
चांगला फायदा होईल. अभ्यासूपणे गोष्टी जाणून घ्याल. हसत-हसत संभाषण कराल.
मीन:- उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
बढतीचा योग येईल. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. उधारीचे व्यवहार तूर्तास
टाळावेत.
Post a Comment