माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने सांगितलं टीम इंडियाच्या पराभवाचं कारण

Image result for india vs new zealand
माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने सांगितलं टीम इंडियाच्या पराभवाचं कारण
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यात दुसऱ्या व्हाईटवॉशला सामोरं जावं लागलं आहे. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं आव्हान ७ गडी राखत पूर्ण केलं. यामुळे वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला भारतीय संघाचा हा पहिला मालिका पराभव ठरला आहे.
ऑस्ट्रेलियन संघाचे माजी खेळाडू इयन चॅपल यांनी भारतीय संघाच्या खराब कामगिरीचं विश्लेषण केलं आहे. टी-२० मालिकेत रोहित शर्माच्या दुखापतीनंतर भारतीय संघाला योग्य अशी सुरुवात न मिळाल्यामुळे पराभवाचा सामना करावा लागल्याचं मत चॅपल यांनी व्यक्त केलं.
“वन-डे मालिकेपासून सुरु झालेला संघ निवडीचा मुद्दा कसोटी मालिकेतही कायम राहिला. वरकरणी हा एक योगायोग वाटत असला तरीही आपण पाहिलं तर रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यात जिंकू शकलेली नाहीये.” Espncricinfo संकेतस्थळावर लिहीलेल्या लेखात चॅपल यांनी आपलं मत मांडलं.
न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

No comments

Powered by Blogger.