शिक्षकांचे एक दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे जाहीर
![]() |
शिक्षकांचे एक दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे जाहीर |
राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आज घडीला राज्यात 156 देशात 863 जण कोरोनाचे पॉझिटिव्ह आहेत. तर, आतापर्यंत 17 जणांचा यात बळी गेलाय. दिलायसादायक बाब म्हणजे यातील 73 जण पूर्णपणे बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आणि अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक
संघ या शिक्षकांच्या संघटनांनी आपले एक दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता
निधीसाठी देण्याचे जाहीर केले आहे. याबाबतचे पत्र देखील दोन्ही संघटनेच्या
वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे. राज्यात संघटनेचे
जवळपास 2 लाख सदस्य आहेत. सध्याच्या परिस्थितीचे भान राखत समितीच्या वतीने
एक दिवसांचे शिक्षकांचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती
प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष उदय शिंदे यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या पाहा
Post a Comment