बीड, वसई नंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत पोलिसांना मारहाण

बीड, वसई नंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत पोलिसांना मारहाण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी सुरू असताना बारामतीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामती तालुक्यात दोन ठिकाणी संचारबंदीसाठी तैनात पोलिसांना मारहाण केल्याचे प्रकार समोर आले आहेत. काल दुपारी बारामती शहरातील जळोची भागात पोलिसांवर काही नागरिकांनी मारहाण केली होती. यात काही कॉरंटाईन नागरिकांनी मारहाण केल्याची माहिती आहे तर काटेवाडीत देखील पोलिसांना मारण्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या मुलाने पोलीस कर्मचाऱ्याला स्टंपने मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना तालुक्यात मारहाण केल्याच्या एकाच दिवशी दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काटेवाडी हे अजित पवार यांचं गाव म्हणून ओळखले जाते. शहरात दिवसभरात एकूण दहा पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे बारामतीत पोलिसांची सुरक्षा आता ऐरणीवर आली आहे.

याआधीही वसईत पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं होतं तर बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. तर मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. अशा घटनांमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे.




संबंधित बातम्या पाहा

No comments

Powered by Blogger.