माजलगांव भागात गाय पिसाळली, 4 जखमी

माजलगांव  भागात गाय पिसाळली, 2 जखमी

बीड रोड, विवेकानंद नगर, बँक काॕलनी, काडीवडगांव नं२, नविन भाटवडगांव, मंजरथ रोड या भागातील रहिवासी यांना कळविण्यात येते की, काळ्या रंगाची मोठी गाय पिसाळलेली असून ती दिसेल त्याला मारीत आहे. माजलगाव शहरात काळ्या रंगाची गाइने उच्छेद घालणे सुरु केले होते शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास प्रभाग एक मधील रहिवासी सौ. पुष्पाबाई साखरे  व  मुक्ताबाई भिसे या दोघी जाणींवर या गाइने अचानक हल्ला केला.


पुष्पाबाई साखरे यांच्या  डोक्यास गंभीर दुखापत झाली असून मुक्ताबाई यांच्या गळ्यात शिंग घुसले असून त्यांची प्रकृति चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलावण्यात आले आहे.
काही वेळाने नगरपालिकेच्या माध्यमातून गाईला नियंत्रित करण्यात आले.











No comments

Powered by Blogger.