नव्या आरोपामुळे जगभरात खळबळ अमेरिकेने सोडला चीनमध्ये कोरोना

Image result for chin america
नव्या आरोपामुळे जगभरात खळबळ अमेरिकेने सोडला चीनमध्ये कोरोना
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी ट्वीक केले आहे की, “वुहानमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार करण्यासाठी अमेरिकन सैन्य जबाबदार असू शकते. या प्रकरणात अमेरिकेने आपली जबाबदारी स्वीकारावी”. चीनने केलेल्या या आरोपामुळे जगभरात खळबळ माजली आहे.
 कोरोना विषाणूने जगातील सर्व देश हैराण असताना, दुसरीकडे चीन आणि अमेरिका यांच्यात तणावाचे वातावरण आहे. चीन सरकारने अमेरिकेवर वुहानमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार केल्याचा आरोप केला आहे. चिनी सरकारी अधिकाऱ्याने असे म्हटले आहे की, अमेरिकन सैन्याने वुहानमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार केला होता. त्यानंतर, तो जगभर पसरला आहे.
वुहानमधून कोरोना पसरल्याचा आरोप चीनवर करण्यात आला होता. त्यामुळं सध्या 80-85 देशांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे (CDS) संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी अमेरिकेतील लोकांचा मृत्यू इन्फ्लूएंझामुळे झाला होता. या लोकांना चीनच्या कोरोना विषाणूची लागण झाली असेल तर याला चीन जबाबदार आहे, असे सांगितले आहे.
झाओ लिजियान यांनी अमेरिकेला प्रथम आपल्या रूग्णांची नेमकी संख्या जाहीर करण्यास सांगितले. याआधी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून व्हाईट हाऊसचे सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ. ब्रायन यांनी कोरोना पसरल्याबद्दल चीनला दोषी ठरवले होते.
तर, झाओ यांनी अमेरिकेवर पलटवार करत, स्वत:च्या देशाकडे लक्ष द्यावे असा सल्ला दिला आहे. चीनने अमेरिकेला धारेवर धरत, CDCची चूक उघड झाली आहे. त्यामुळे चीनला जबाबदार धरू शकत नाही. अमेरिकेने प्रथम सांगावे की त्यांचा पहिला रुग्ण कधी आला, आता त्याची प्रकृती कशी आहे? कोरोना बाबतीत चीन अमेरिकेपेक्षा अधिक पारदर्शक आहे”, असा सवाल केला आहे.
चीनचे सरकारचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी या अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी चीनबद्दल बोलण्यापूर्वी त्यांनी स्वत:च्या समस्या लक्षात घ्याव्यात. अमेरिकन अधिकारी कोरोनाचे प्रकरण लपवत आहेत. पूर्ण पारदर्शकतेने चीनने कोरोनाची माहिती योग्य वेळी सार्वजनिक केली हे संपूर्ण जगाला माहित आहे, असा इशारा महासत्ता म्हणून मिरवत असलेल्या अमेरिकेला दिला होता.

No comments

Powered by Blogger.