"रोहित तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही तसं सांग" मुख्यमंत्र्यांचा रोहितला शब्द

“रोहित याबाबत तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही तसं सांग. यापुढे होणारी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल.” असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. तसंच मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनामुळे मी त्यांचे आभार मानतो, असंही रोहित पवारांनी म्हटलं. राज्यात होणारी महाभरतीची प्रक्रिया महापोर्टलऐवजी ऑफलाईन पद्धतीने घ्यावी यासाठी राहित पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी रोहित पवार यांना उद्धव ठाकरे यांनी भरती ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचं आश्वसनं दिलं आहे.
लवकरच महारभरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. ही भरती ऑफलाईन पद्धतीनेच होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं रोहित पवारांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे.
महापोर्टल बंद
नोकरभरतीमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी फडणवीस सरकारने सर्व प्रशासकीय विभागातील ब आणि क गटातील पदभरतीची परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या महापरीक्षा पोर्टलमध्ये मोठय़ा प्रमाणात घोटाळा असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून होत होत्या. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या पोर्टलविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलानाचे नेतृत्व करीत हे पोर्टल बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत हे महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने २१ फेब्रुवारी रोजी घेतला असून तसा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. महाआयटीकडे ऑफलाइन पद्धतीने चाचणी, टंकलेखन आदी परीक्षा घेण्याकरिता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने हे महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
पोर्टलमध्ये गैरव्यवहार?: नोकरभरतीमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने सर्व प्रशासकीय विभागातील ब आणि क गटातील पदभरतीची परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या महापरीक्षा पोर्टलमध्येच गैरव्यवहार असल्याच्या तक्रारी होत्या. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनही केले होते.


काय होते रोहित पावरच्या  फेसबुक पोस्टमधे ?
राज्यात लवकरच महाभरतीची प्रक्रिया सुरु होणार असून त्याबाबतची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. पण आधीच्या 'महापोर्टल'च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या नोकर भरतीचा वाईट अनुभव लक्षात घेता राज्यातील तरुणांचा ऑनलाइन नोकरभरतीला तीव्र विरोध आहे. अनेक तरुणांनी मला, अन्य आमदारांना व नेत्यांना भेटून ऑफलाईन भरती करण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार काल मुख्यमंत्री श्री. उद्धव जी ठाकरे साहेब यांची वैयक्तिकरित्या भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तरपणे या विषयावर चर्चा केली. यावेळी त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत मला आश्वस्त केलं. ते म्हणाले, "रोहित याबाबत तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही तसं सांग. यापुढे होणारी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल."
मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या आश्वासनामुळे मी त्यांचे आभार मानतो. यामुळे अधिकाधिक तरुणांना नोकरभरतीच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याशिवाय भरती करताना एका दिवशी एकाच पदासाठी संपूर्ण राज्यात परीक्षा घेण्यास सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं.
तसंच पूर्वी महापोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांनाही या भरतीत प्रक्रियेत सामावून घेण्यात यावं आणि 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगा'तील सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात आणि 'एमपीएससी'च्या माध्यमातून जी पदं भरली जातात त्या पदांची रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणीही यावेळी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. यावरही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

No comments

Powered by Blogger.