महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ३१ रुग्ण करोना आपत्ती घोषित
महाराष्ट्रात सर्वाधिक ३१ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील कोरनाच्या रुग्णांची संख्या १०१वर पोहोचली आहे.
करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारताने सर्व आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमार सीमेवरील प्रवासी वाहतूक आजपासून बंद करण्यात आली आहे. पुढच्या आदेशापर्यंत शेजारी देशांचा प्रवास बंद करण्यात आल्याचं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. पण सीमेवरील मोजक्याच पोस्टवर अत्यावश्यक गरजांसाठी वाहतूक सुरू राहणार आहे. भूतान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमधून रस्तेमार्गे होणारी प्रवासी वाहतूक १५ मार्च मध्यरात्रीपासून, तर पाकिस्तानबरोबरची सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक १६मार्च मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. देशातील करोनाच्या रुग्णांच्या संख्या सतत वाढत आहे.
करोना आपत्ती घोषित केंद्र सरकारने करोना व्हायरस ही आपत्ती घोषित केली आहे. करोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबीयांना ४ लाखांची मदत दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. करोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं आपत्ती निधीचा उपयोग करू शकणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाचा अधिकारी किंवा एखाद्या देशाच्या राजदुताला भारतात यायचं असल्यास त्याला अटारी-वाघा सीमेवरून प्रवेश देण्यात येईल. यावेळी करोनाची संपूर्ण तपासणी करून भारतात प्रवेश दिला जाईल, असं सरकारनं स्पष्ट केलं. भारत-बांगलादेश दरम्यानची रेल्वे आणि बस सेवा १५ एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली आहे. ही तारीख आणखी वाढवली जाण्याची शक्यता आहे.
Post a Comment