CoronaUpdates | कोरोनाचा फटका शेतकऱ्यांना

CoronaUpdates | कोरोनाचा फटका शेतकऱ्यांना
कोरोनाचा फटका नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पिकांना बसला आहे नाशिक जिल्ह्यात जवळपास 40 हजार एकरावर द्राक्षाची शेती केली जाते मात्र सर्व द्राक्ष आपल्या शेतामध्ये पडून आहेत. 
एकीकडे मजूर मिळत नाही, तर दुसरीकडे पॅकेजिंगचे साहित्य नाही. व्यापारी शेतामध्ये येत नाही त्यामुळे माल विकला जाऊ शकत नाही. अशा पेचात नशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार अडकला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारला याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे. आता द्राक्ष हार्वेस्टिंग केली नाही तर याचा परिणाम पुढच्या हंगामावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आणखी कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे.  


संबंधित बातम्या पाहा 

No comments

Powered by Blogger.