Coronavirus | पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन - पंतप्रधान नरेंद्र मोदी

India lockdown
Coronavirus | पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन  - पंतप्रधान नरेंद्र मोदी
करोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्यानं होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे  पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनता कर्फ्यूला सफल करण्यात सर्व भारतीयांचा हात आहे. जेव्हा देशात संकट येते तेव्हा सर्व एकत्र येतात त्यांमुळे सर्व भारतीय या यशाचे शिल्पकार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

कोरोना हा आगीसारखा हा पसरत चालला आहे. त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे सोशल डिस्टनींग आणि घरातच राहणं. देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी ही घोषणा केली आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीनं लागू केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी म्हणाले, प्रगत राष्ट्रात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आले. याला थोपवायचे असेल तर आपल्याला गर्दी टाळणे हा एकमेव पर्याय आहे. आपल्याला हे लक्षात आले नाही तर आपल्याला फार मोठी किंमत चुकवावी लागेल.



संबंधित बातम्या पाहा


No comments

Powered by Blogger.