CoronavirusOutbreaks | पंतप्रधान मोदींनी सांगितलेली 'ही' सहा पथ्यं !
![]() |
CoronavirusOutbreaks | पंतप्रधान मोदींनी सांगितलेली 'ही' सहा पथ्यं ! |
जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. या महासंकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज असून कोरोनाला टक्कर देणाऱ्या प्रत्येक भारतीयांचे मोदींनी आभार मानले. तसेच, या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही सूचवले आहे. रविवार 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत देशात जनता कर्फ्यु लागू करुन नागरिकांनी जगाला एकजुटीचा संदेश द्यावा, असे आवाहनही मोदींनी केले. तसेच नागरिकांना काही बेसिक सूचनाही केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सर्वसामान्य नागरिकांपासून ते वैद्यकीय क्षेत्रात आणि कोरोनाशी दोनहात करणाऱ्या प्रत्येक भारतीयांच्या कामगिरीला स्पर्श केला. तसेच, नागरिकांना महत्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.
- रुटीन चेक अपसाठी डॉक्टरांकडे न जाता फोनवरच सल्ला घ्या.
- एखादी सर्जरी इमर्जन्सी नसेल तर पुढची तारीख घ्या.
- देशात दूध, अन्नधान्य, औषधं आणि सर्व जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये यासाठी पावलं उचलली आहेत. उगाच अधिकचं वाणसामान भरून ठेवू नका. त्यासाठी गर्दी करू नका.
- ६०-६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडणार नाहीत, याची काळजी घ्या.
- पुढचे काही आठवडे खूपच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. व्यवसाय असो, नोकरी असो शक्य असल्यास घरूनच काम करा.
- आपल्याकडे काम करणाऱ्यांना आवश्यक सवलत द्या, त्यांचीही काळजी घ्या.
Post a Comment