CoronaVirusUpdate | विराटचा ‘जनता कर्फ्यू’ला पाठिंबा

CoronaVirusUpdate | विराटचा ‘जनता कर्फ्यू’ला पाठिंबा
करोनाने अवघ्या मानवजातीला घेरले असून संपूर्ण जग आपत्तीला सामोरे जात आहे. भारतासारख्या १३० कोटींच्या, विकासाकडे वेगाने धाव घेणाऱ्या देशाला बेफिकीर राहता येणार नाही. या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी काही संकल्प करण्याची गरज आहे. त्यानुसार रविवारी २२ मार्चला लोकांनी स्वत:च्या घराबाहेर न पडता ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री आठ वाजता देशाला उद्देशून भाषण केले. त्यावेळी, या साथीच्या रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने या विषाणूपासून स्वत:चे रक्षण करण्यास प्राधान्य द्यावे, असा संदेश मोदी यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानेही मोदी यांच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे. “सावधान राहा, सतर्कता बाळगा. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि फैलाव टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या. भारताचे नागरिक म्हणून जबाबदारीने वागा. पंतप्रधान मोदी यांनी सुचवलेले सुरक्षिततेचे उपाय पाळा आणि करोनाशी दोन हात करा”, असा संदेश विराटने दिला आहे.


संबंधित बातम्या पाहा


 

No comments

Powered by Blogger.