CoronavirusUpdates | बीड जिल्ह्यात सोमवारी रात्री १२ वाजेपासून संचारबंदी लागू
![]() |
CoronavirusUpdates | बीड जिल्ह्यात सोमवारी रात्री १२ वाजेपासून संचारबंदी लागू |
बीड जिल्ह्यात सोमवारी रात्री १२ वाजेपासून संचारबंदी लागू करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.
ही संचारबंदी अंशतः असणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जीवनावश्यक वस्तुंची देवाणघेवाण करण्यासाठी ही शिथील करण्यात येणार आहे. या वेळेत जमावबंदी लागूच राहाणार असल्याचे या वेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सांगितले.
या संचारबंदीच्या कालावधीत रस्त्यावर जर कोणी विनाकारण फिरताना आढळले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाच्या सीमेवर कसून तपासणी करण्यात येत आहे. या शिवाय पेट्रोल-डिझेल विक्री ही काही ठराविक वेळेतच करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही संचारबंदी ३१ मार्चपर्यंत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जीवनावश्यक वस्तुंची देवाणघेवाण करण्यासाठी वेळ असेल.
- 11 ते ३ या वेळेत जमावबंदी लागूच असेल. पाच पेक्षा जास्त नागरिकांना येण्यास बंदीच असेल.
- जीवनावश्यक, आपत्कालीन सेवा चालू राहणार
- ही बंदी ३१ मार्च पर्यंत राहणार आहे
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची माहिती.
Post a Comment